मग तुम्हाला काय वाटते खरंच असते का ते पहिल्या नजरेतलं प्रेम ? की असते नुसते शारीरिक आकर्षण ?

मोरू,

"पहिल्या नजरेतलं प्रेम" होणे यातली, शारिरीक आकर्षण ही पहिली पायरी आहे.  आणि त्यात काही गैर आहे असे नाही. त्यातुन एकत्र आल्यावर पुढच्या खऱ्या प्रेमाचा पाया भक्कम होऊ शकतो.

बरेच लोक शारिरीक आकर्षणाने एकत्र येतात, परंतु स्वभाव जर जुळले नाही तर ते दूर होतात.

बऱ्याचदा असे दिसते, की जोडी अगदीच विजोड वाटते. म्हणजे, "सुंदर झाडावर बंदर" असे काहीसे, पण असे समाजात दिसते.

याचे कारण असे वाटते की, बराच काळ एकत्र वावरल्याने संपर्कात असल्याने एकमेकांविषयी आपुलकी वाटु लागते विचार जुळतात आणि मग प्रेम निर्माण होते. या ठिकाणी 'पहिल्या नजरेतलं प्रेम' हा प्रकार नसतो.

असो,

--------------------------------------

बऱ्याच चर्चा चालु करता आणि मग असे लिहीता,

 मी पण स्वतः द्विधा मन:स्थितीत आहे.

यावेळी पण असेच काही नाही ना! (ह. घ्या. हो उगाच तिरका वाद नको)

--------------------------------------

--सचिन