नमस्कार,

असा प्रकल्प तयार व्हायला हवा. अनामिका हे संकेतस्थळ खरोखर उत्तम होते. पण त्यावर कुणीतरी घुसखोरी केली. सध्या ते संकेतस्थळ बंद आहे आणि त्याचे व्यवस्थापक सुद्धा मनोगताच्या प्रशासकांसारखे कुठलाच प्रतिसाद देत नाहीत.

पण मराठी ई- पुस्तकांची महाजालावरील वर्दळ वाढावी असं माझं मत आहे. अनेक लेख एका जागी वाचायला मिळाले तर खुप बरं होईल. ई पुस्तकं वाचायला - दुसऱ्यांना द्यायला सुटसुटीत आहेत.

मी काही मदत करू शकलो तर नक्की करेन.

नीलकांत