दिगम्भा,
अहो माफी कसली मागता? माझ्या भावना भक्कम आहेत :-)

आणि गालिबऐवजी माझा उपयोग केला तर त्याला माझी अजिबात हरकत नाही :-) माझ्या प्रतिसादामागची भूमिका सांगतो तुम्हाला. मी ह्या चर्चेत सापडलो वगैरे नाही. यावे लागले. काय आहे, ग़ालिब म्हणजे माझ्या दृष्टीने घरचं माणूस आहे. आणि एकदा घरचं माणूस म्हटल्यावर कुणी त्याच्याबद्दल काही बोलले तर प्रतिसाद देणे भाग आहे. एवढेच. यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व. तसा माझा हेतू नव्हता.
हॆम्लेट