मन मोकळे करण्यासाठी आजवर कितेक लोक रोजनिशी लिहीत आलेत व लिहीत राहतील.  मन मोकळे करण्याचे लेखन एक सोपे आणि परिणामकारक साधन आहे. 

प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार आयर्विंग वॉलेस याने हीच गोष्ट निराळ्या पद्धतीने सांगितली आहे. तो म्हणतो, "लेखक भाग्यवान असतो. तणावमुक्तीसाठी त्याच्याकडे असलेली लेखनकला त्याला उपयोगी पडते."