सचिन आणि सव्या यांनी सांगितल्याप्रमाणे 'पहिल्या नजरेतलं प्रेम' दुसरे तिसरे काही नसून शारीरिक आकर्षणच आहे.

जरी प्रेम आंधळे मानले जाते तरी ही बाजू मात्र डोळसपणे पाहिली जाते ही सत्य परिस्थिती आहे. बऱ्याचजणांना आपला जोडीदार सुंदर दिसावा ही मनोकामना असतेच. अर्थात यात काही वावगे नाही. नाहीतर लग्नानंतर सुंदर चेहऱ्यांकडे बघणे चांगले नव्हेच ;)  

पण 'माझा जोडीदार सुंदर आहे म्हणून तो मला पहिल्या भेटीतच आवडला आणि नंतर एकमेकांवर प्रेम जडले' आणि 'माझे तिच्यावर खरेच प्रेम आहे आणि तिच्या रुपाने मला काहीही फरक पडत नाही' ह्या दोन्हीतलं प्रेम वेगळे आहे का ?

- मोरू