माझ्या माहितीप्रमाणे सांजा म्हणजे तेलात रवा भाजून फक्त चवीसाठी एक मिरची घालून सौम्य चव येते तो सांजा व यामध्ये हळद घालतात किंवा काहीजण यालाच तिखटामीठाचा शिरा म्हणतात. सांजा करताना तो शिजण्याकरता पाणी घालतात ते थोडे गरम पाणी घालतात. गरम पाणी घातल्याने सांजा मोकळा होतो. घट्ट होत नाही.

उपमामध्ये हळद घालत नाहीत, ताक व उडीद डाळ  घालतात. उपमा हा शब्द बहुधा साउथ इंडीयन लोक वापरतात. ते पोह्याला पण पोहा उपमा किंवा ब्रेडच्या भाजीला ब्रेड उपमा म्हणतात.