अनु, भास्करराव, विनायकराव, मंदारराव आणि गीता, आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

मंदार, वर्‍हाडीत मंगलाष्टके शोधावे लागतील. सापडलीत की नक्की कळवतो.

विनायकराव, अहिराणी भाषा आणि वर्‍हाडी भाषा सारखी आहे की नाही याबद्दल मला शंकाच आहे. मला वाटते, जयच्या एका कवितेच्या प्रतिसादात सुनीलने या दोन भाषांवर काही प्रकाश(?) टाकलेला आहे.

भास्करराव, तुम्ही कातावून :-) लिहिलेला प्रतिसाद वाचुन गंमत वाटली. कदाचित सुनेला बघितल्यावर मोठ्यांचा राग निघुन जात असेल. (माझी आपली वेडी समजुत)

आरं पोरा, माय-बापाले कायले सांगुन र्‍हाता तुमी. हाऊन जाउंदे दोनाचे चार आन मंग सांग त्याले. बाप ते करेन काय, सुनाले पायले की सम्दा राग निगून जायील.

अनु व गीता, जुळल्यावर नक्की मनोगतवर कळवण्यात येईल, तुम्हा सर्वांना अगदी आग्रहाच्या निमंत्रणासोबत. वर्‍हाडात एक मेळावाच आयोजित करता येईल रसिक मनोगतींचा. द्वारकानाथांची खुप दिवसांची ईच्छा पुर्ण होऊन जाईल. लग्नाच्या आधल्या रात्री मनोगतींच्या कविता, मस्ती आणि धुम. नंतर disturb नको :)

आत्ता, खरं सांगु का? माझं तर अजुन सुरुच व्हायचं आहे हो. पण ३-४ मित्रांसोबत मुली पाहण्यात माझं द्विशतक पुर्ण झालय :-O मित्रांच्याच अनुभवातुन जन्माला आलेला हा झटका.