चित्तजी,
माझ्या नावाचे मला काहीतरी करायला हवे बुवा! "प्रभावित" हे नाव पाहून "भावड्या", "राव" अशी विशेषणे (?) मिळतायत! :) असो.
प्रेमातली बालकविता, बालकवीची प्रेमकविता! ह्म्म मलाच आता माझ्या मानसिक वयाबद्दल चिंता वाटू लगली आहे. :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अहो, मी सहज पहिली ओळ टाईप केली आणि पुढे जुळवत गेले. लिहिल्यावर मला वाटले आता पर्यंत ऐकलेल्या बऱ्याच गाण्यांची आणि कवितांची छाप आहे. एवढेच. (गंध फुलांचा गेला सांगत, आज कळीला एक फूल भेट्ले, फुलराणी वगैरे)
हे कदाचित मनोगतावर प्रकाशित करण्याच्या लायकीचे नव्हते. :P पण हातातून बाण सुटला आहे.
बराहच्या वापराचा प्रयत्न सुरु आहे. पण म्हणावे तसे यश नाही. आपण वापरता का?
-सीमा (प्रभावित)