मनोगतावर निश्चितच प्रकाशित करण्याच्या लायकीचे आहे. लायकी ठरवणारा मी कुणी नाही. कवितेची एकंदर रचना, वारा आणि कळीचे भाबडे हितगुज वाचून वाटले. बाकी काही नाही. कल्पना चांगली आहे.
"ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून
आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका
टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून
व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा
सर्वांचा सहभाग आम्हाला हवा आहे."
असे मनोगताच्या मुखपृष्ठावर लिहिलेच आहे. कुठलाही गैरसमज नसावा. अजून लिहा. तुम्ही उत्तम लिहाल.