"चलता है" म्हणायच्या ऐवजी जर योग्य त्या पद्धतीने आवाज उठवला तर गोष्टी घडू शकतात. फक्त तसे वागायची/करायची धमक आणि इच्छा पाहीजे.
माझ्या अनुभवात दोन देशात - अमेरिका आणि भारत, चांगल्या आणि वाईट गोष्टी आलेल्या आहेत. माणसे मदत करणारी असतात आणि नाडणारी पण. भारताबद्दल म्हणून मला काही निराशावादी व्हावेसे वाटत नाही जरी काळजी नक्कीच वाटत असली तरी. एक महत्त्वाचा फरक इतकाच की अमेरीकेत "सिस्टीम/व्यवस्था" जितकी तळागाळाला पोचली आहे आणि त्याचे हक्क सामान्य लोक जेव्हढे वापरतात तेव्हढे भारतात नाही.