हे दोन पुणेरी उत्तरांचे मासलेवाईक किस्से...

कर्वे रोडच्या सुरुवातीला एक मध्यमवयीन गृहस्थ एका दुचाकीवाल्याच्या पुढे आले. दुचाकीस्वाराने करकचून ब्रेक दाबला व तो थांबला. अत्यंत विनयाने त्याने त्या गृहस्थांना विचारले,'काहो, तुमचं नाव कर्वे का?' 'नाही, का?' ते गृहस्थ बावरून म्हणाले. 'मग रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का?'

मागून सतत हॉर्न वाजवणाऱ्याला एकाने वळून विचारले,'बाप मेला काय रे तुझा?' मागचा उत्तरला 'तुमच्यात बाप मेल्यावर हॉर्न वाजवतात काय?'