पुण्यात खराब रस्त्यांविरुद्ध खूप तीव्र आंदोलन झाले. लोकांनी आकाश-पाताळ एक केले, मोर्चे नेले, पालिका कर्मचाऱ्यांना शिव्या घातल्या
आपण म्हणता म्हणून विश्वास ठेवतो पण माझ्या वाचनात कधी हे आले नाही. पुण्यात किती आंदोलने झाली हे एकदा पुण्यात राहणाऱ्या लोकांना विचारा. कुठल्याही राजकारण्यास, पालिका कर्मचाऱ्यास लाज वाटावी इतपत आंदोलने पुण्यात झाली. तुमच्या वाचनात आले नाही म्हणजे असे झालेच नाही असे नव्हे. आंदोलने होणे म्हणजे अगदी रक्तपात होणे असेही नव्हे.
आपल्या पहिल्या प्रतिसादातील (लाल अक्षरातील) विधानावर मी माझ्या प्रतिसादात (निळ्या), वाचनात आले नाही ही सत्य परिस्थिती असूनही, विश्वास ठेवतो असे म्हंटले आहे. तरीही, 'तुमच्या वाचनात आले नाही म्हणजे असे झालेच नाही असे नव्हे' अशी शब्दयोजना का? ह्याने वादाची दिशा बदलून भांडणे सुरू होतात. तसे असेल ह्या विषयावर वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा मनोगतावर माझे इतरत्र बरेच वाचन बाकी आहे.
मागच्या ४ महिन्यातली वृत्तपत्रे (सकाळ, टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस ई.) जरा चाळून पहा म्हणजे पुणेकरांच्या संतापाची आणि अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याची प्रचिती येईल.
आपण एकटेच वर्तमानपत्रे वाचता ह्या भ्रमात राहू नका.
पुण्याचे मुंबईजवळ असणे, पुण्याचे वातावरण चांगले असणे, पुण्यातले नागरिक शांतताप्रिय असणे या व अशा कित्त्येक अजिबात सरकारी शिक्का नसलेल्या कारणांमुळे संगणक क्षेत्र पुण्याकडे आकृष्ट झाले.
वाचून करमणूक झाली.
सरकारला म्हणजेच आपल्या पुढाऱ्यांना किती डोके असते हे सगळ्या जगाला माहिती आहे. लालुप्रसाद चे एव्हढे कौतुक चालले आहे, आय आय एम मध्ये त्याची केस स्टडी ठेवली जात आहे. का तर म्हणे ३-४ वर्षात त्या माणसाने रेल्वे प्रचंड नफ्यात आणली. जो माणूस बिहारचा मुख्यमंत्री असतांना यत्किंचितही विकास घडवून आणू शकला नाही, उलट बिहारची परिस्थिती अधिकाधिक बिघडली त्या माणसाकडून एवढे मोठे काम कसे झाले?
हा प्रश्न आय् आय् एम् च्या व्यवस्थापनाला, सेमिनारला हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना, स्थानिक नेत्यांना, समाजसुधारकांनां, आलतू-फालतू कारणांवरून 'तीव्र आंदोलने' करणाऱ्या कुठल्याही पक्षकार्यकर्त्यांना पडला नाही. म्हणजे आम जनताच मूर्ख आहे. त्यातूनच राजकारणी निवडले जातात.
अतिआदर्शवाद जगात चालत नाही.
योग्य प्रमाणात तो चालतो हे कबूल आहे तर!
आता फक्त 'योग्य' काय आणि 'अति' काय ह्याची सर्वमान्य व्याख्या ठरवावी लागेल.