माझे म्हणणे एवढेच आहे की सात वर्षे यावरून जितक्या सहजपणे सेव्हन एअयर इच(हे नक्की काय आहे देवच जाणे पण त्यातल्या इच शब्दामुळे मला जाम शंका आहे की काहीतरी वाईट असावे) आठवते...

अर्थ माहीत नाही, तर तो माहीत करून घेण्याऐवजी काहीतरी (बहुधा चुकीचा) अर्थ गृहीत धरून त्याच्या आधारावर डोक्यात राख घालून कोणाशीतरी तावातावाने भांडणे, एखाद्यावर वाटेल ते आरोप करणे कितपत योग्य आहे? पुढचा वाद घालण्यापूर्वी किमान दुसऱ्याने जे काही म्हटले आहे त्याचा अर्थ शोधण्याचे (किंवा सहज सापडला नाही तर विचारण्याचे) कष्ट घेणे हे भारतीय आणि (विशेषतः) मराठी सामाजिक रचना आणि परंपरा यांना अनुसरून नसेलही कदाचित, पण सभ्यतेला धरून नसावे असे वाटत नाही.

असो. मराठी भाषेतील दोन म्हणींची यावरून आठवण येते.

१. बाजारात तुरी, आणि भट भटणीला मारी. (जातीयवाचक लेखनाबद्दल आगाऊ क्षमस्व!)
२. डोंगर पोखरून उंदीर.

- टग्या.