संतांकडे वैज्ञानिक म्हणून न बघता विचारवंत म्हणून बघितले पाहिजे. त्या
काळातही वैज्ञानिक झाले असतीलच. पण अस्थिर सामाजिक - राजकीय स्थितीमुळे
त्यांना वाव मिळाला नसणार.
संतांकडे विचारवंतापेक्षादेखील साधू(सज्जन) पुरुष म्हणून बघायला हवे. तसेच त्या काळात वैज्ञानिक-बिज्ञानिक फारसे झाले नसावेत असे वाटते. मध्ययुगापासून बाहेरील देशांशी होणारा व्यापार कमी झाला. सामंतवाद(Feudalism) वाढला. मौर्यांसारख्या बलशाली केंद्रीय सत्ता राहिल्या नाही. विचारांची देवाणघेवाण अगदी कमी झाली. नवे विचार आले नाहीत, गेले नाहीत. वैज्ञानिक प्रगती खुंटली. ११ व्या शतकातल्या अल-बेरुनी ह्या अरबी मुशाफिराने त्याच्या प्रवासवर्णनात ब्राह्मणांचे गुणगान केले आहे. ब्राह्मण विद्वान असतात वगैर वगैरे. पण आपले ज्ञान इतरांना देत(Disseminate) नाहीत, असे त्याने त्याच्या तारीख़-उल-हिंद ह्या पुस्तकात लिहिलेले आहे. ह्या संकुचितपणामुळेच मध्ययुगानंतर भारताची वैज्ञानिक प्रगती झाली नाही.