संतांचे उपदेश मनावर घेऊन लोक दैनंदिन व्यवहार करत होते असे वाटत नाही. तुकारामाने ठेविले अनंते तैसेचि राहावे म्हटले म्हणून लोक बदलले नाहीत. संतांच्या प्रभाव खरेच एवढा व्यापक होता काय? संतांमुळे जातीच्या भिंती जमीनदोस्त झाल्या नाहीत. वारकऱ्यांपुरती, वारीपुरतीच ही समता. असो.

महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या अभंगांतून धनाला, उपभोगांना (आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नांना) तुच्छ लेखण्याचा जो उपदेश केला, त्यामुळे महाराष्ट्र निष्क्रीय झाला, मराठी लोकांमधली स्पर्धात्मक वृत्ती संपली, ते आळशी झाले आणि त्यामुळे एकूणच सर्व महाराष्ट्राचे वाटोळे झाले, असा एक बराच लाडका विचारप्रवाह आपल्याकडे आहे.
त्यामुळे ह्या विचारप्रवाहात अर्थ नाही.


संतांनी सुखाकरता, वैज्ञानिक प्रगतीवर भर देण्याऐवजी माणसाला बदलण्याच्या उपायांवर भर दिला. आणि म्हणूनच, संतांचा हा दृष्टीकोन अधिक मूलभूत, आणि अधिक 'वैज्ञानिक' आहे असे मला वाटते.

हे कानांना सुखद असले तरी बाबरचा हेमूच्या फौजेवरील विजय हा अधिक चांगल्या फिरत्या तोफांमुळे झाला. भारतात चांगले घोड्यांची पैदास कधी झाली नाही. संख्याबळाने युद्ध जिंकता येत नाही. आधुनिक तंत्रज्ञान हवेच. त्याबाबत संत काही भरीव कार्य करू शकले असते असे वाटत नाही.