परभारतीयराव,
अतिशय मोठा विषय आपण या ठिकाणी मांडल्याबद्दल आणि त्यासाठी घटनाक्रम योग्य रितीने (संदर्भासाठी म्हणून) दिल्याबद्दल आपले अभिनंदन !!
माझे मत असे:
१) अमेरिकेला या युद्धात काय किंवा नंतरच्या युद्धात काय , स्वतःच्या सैन्य बळावर युद्ध जिंकता आलेले नाही. - या घटनाक्रमांचा संदर्भ जर लक्षात घेतला तर हे सहजच लक्षात येईल. पण त्याला जोड म्हणून अमेरिकेने केलेली अणुशक्तीची प्रगती जर लक्षात घेतली तर अमेरिकेने हे युद्ध नवीन (त्यावेळेच्या) तंत्रज्ञानामुळेच जिंकले असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
२)यूरोपमधील युद्ध संपले तरीही आणि जपानला जिंकणे अतिशय अवघड आहे असे लक्षात आल्यानंतरही केवळ आपल्या अट्टाहासापायी अमेरेकेने हे युद्ध चालूच ठेवले,असे आपल्याला म्हणता येईल.
३) नवीन तंत्रज्ञानाचा लगेचच वापर करायची तयारी, त्या नवीन तंत्रज्ञानावरची अमेरिकेची पकड दाखवते.
४) एप्रिल१९४५ नंतर लगेचच युद्ध थांबले असते तर कदाचित, जगाला आज अमेरिकेची एवढी दहशत वाटली नसती.
५) पर्ल हार्बर वरील हल्ल्यानंतर अमेरिका जागी झाली आणि युद्धाला एक ताज्या दमाचा भक्कम साथीदार मिळाला.
या सर्व कारणांनी मला वाटतं, कि त्यावेळेला अमेरिकेने जपानला प्रत्यक्ष एक अणूयुद्धाची प्रायोगीक जागा म्हणूनच वापरलं!!
तसेच सर्व जगाला या प्रयोगाचा साक्षीदार ठरवलं!!
या प्रयोगातून सिद्ध काय केलं - अमेरिका या ना त्या मार्गाने युद्ध जिंकेलच!!
माझी मते वरील प्रमाणे आहेत. आपला प्रतिसाद अपेक्षित!
प्रसाद