>१) अमेरिकेला या युद्धात काय किंवा नंतरच्या युद्धात काय , स्वतःच्या सैन्य बळावर युद्ध जिंकता आलेले नाही. - या घटनाक्रमांचा संदर्भ जर लक्षात घेतला तर हे सहजच लक्षात येईल. पण त्याला जोड म्हणून अमेरिकेने केलेली अणुशक्तीची प्रगती जर लक्षात घेतली तर अमेरिकेने हे युद्ध नवीन (त्यावेळेच्या) तंत्रज्ञानामुळेच जिंकले असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
जगातील बहुतांश युद्धे ही मनुष्यबळापेक्षा युद्धनिती व तंत्रज्ञानानेच जिंक्ली गेलेली आहेत. अगदी चंगीझ खान (उत्तम तीर-कमानी, वेढ्यात हत्तींचा उपयोग), बाबर (बंदूक), शिवाजी महाराज (डोंगरी किल्ले), हिटलर (ब्लिट्झ्क्रीग) पासून जॉर्ज बुश (पहिला व दुसरा) यांचा विजय तंत्रज्ञानाच्या उपयोगानेच शक्य झाला.
२)यूरोपमधील युद्ध संपले तरीही आणि जपानला जिंकणे अतिशय अवघड आहे असे लक्षात आल्यानंतरही केवळ आपल्या अट्टाहासापायी अमेरेकेने हे युद्ध चालूच ठेवले,असे आपल्याला म्हणता येईल.
युद्धाला कोठेतरी निर्णायक अंत येणे अतिमहत्त्वाचे होते. जपानने तर मरेपर्यंत लढण्याचे जाहीर केले होतेच. या परिस्थितीत 'इस पार या उस पार' निकाल लागला नसता तर तोपर्यंतची अमेरिकेची प्रगती (फिलिपान्स, मिडवे, गुआम, इ.) फोल ठरली असती. परिस्थिती अजून भीषण होण्याची शक्यता दाट होती. तरी बॉम्बच्या उपयोगात मला तरी अट्टाहास न दिसता युद्धनिती व मुत्सद्दीपणाच दिसतो.
४) एप्रिल१९४५ नंतर लगेचच युद्ध थांबले असते तर कदाचित, जगाला आज अमेरिकेची एवढी दहशत वाटली नसती.
जगाला दह्शत तर बसलीच पण सोवियेत संघाच्या (जोसेफ स्टालिनच्या) महत्त्वाकांक्षेलाही यामुळे खीळ बसली.
५) या प्रयोगातून सिद्ध काय केलं - अमेरिका या ना त्या मार्गाने युद्ध जिंकेलच!!
अर्थात, युद्ध लढणाऱ्या सगळ्याच देशांचा हाच उद्देश असतो :-)
अभय नातू