श्री. गोळे,

एकांत आणि एकाकीपणा ह्यामध्ये आपण काय फरक कराल?

एकांत हा हवासा आहे. कारण त्यात "मी"चा अंत आहे असे वाटते. पण जर मन "मोकळे" करण्यासाठी माणसाला काही साधन नसेल तर मग घुसमट होते आणि माणूस एकाकी पडतो असे वाटते.

दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून "मनोरंजन" होत असेल पण "मनमोकळे" होत नाही. माणसाला ह्यातील फरक कळू येत नाही हे त्याचे दूर्दैव!

मनातील राग,द्वेष, दु:ख ह्या भावनांचा निचरा कसा करायचा हे कळेल तो सुदिन!

आपले लेखनविषय आणि मांडणी छान असतात हे मी आपल्याला व्य. नि. द्वारे कळविले आहेच मागे.

पुन्हा एकवार अभिनंदन आणि आभार.