आपण म्हणता त्यात तथ्य आहे. शाळेत आम्हा विद्यार्थ्यांकडून पंधरावा अध्याय पाठ करून घेत असत. अर्थ सांगितला जायचा पण कळायचा नाही. पण आता त्याची नक्कीच मदत होते व भविष्यातही होत राहिल. त्यावेळी हे का सांगितलं गेलं नाही ?
पण भौतिकशास्त्र शिकताना याचा उपयोग नाही. आकलनाला अपार महत्त्व आहे. हे आमच्या मास्तरांनी शिकवलं नाही. एकानेही फाइनमन्च्या लेक्चर्सचा उल्लेख केला नाही. फक्त मार्क आणि आयएमपी प्रश्न यावर गुंडाळलं जायचं.