पेठकरसाहेब,

माझा भांडण करण्याचा अजिबात हेतू नाही. आपल्या "तुम्ही म्हणता म्हणून विश्वास ठेवतो, माझ्या वाचनात मात्र कधी आले नाही." या विधानामध्ये अविश्वास ठासून भरलेला आहे. उपहासाची एक झलकही यात आहे. कोणालाही यातून, " तुम्ही म्हणताय राव, पण माझा विश्वास नाही. तुम्ही जे म्हणताय ते काही विश्वास ठेवण्यासारखे नाही पण जाऊ द्या, ते एवढे महत्त्वाचे नाही..." असा उलटतपासणी केल्यासारखा आणि अविश्वास दर्शविल्यासारखा सूर गवसेल. सुरुवात अशा वैयक्तिक टीकेमुळे होते. तुम्ही जर अशी वैयक्तिक टीका आधी सुरू करणार असाल तर मग समोरच्याने पण ती सुरू केली तर आश्चर्य आणि वाईट वाटायला नको. मनोगतींचा हाच फार मोठा प्रॉब्लेम आहे. सुरुवात आधी आपण खिल्ली उडवून, वैयक्तिक टीका करून आणि टोचणाऱ्या भाषेत प्रतिसाद देऊन करायची आणि मग समोरच्याने तसाच प्रतिसाद दिला (जे की अगदी साहजिकच आहे) की मग तक्रार करायची की वैयक्तिक टीका होते आणि भांडणे होतात वगैरे वगैरे!! याला काही अर्थ नाही.

"तुम्ही कोण असे भारी लागून राहिलाय", अशा अविर्भावाचे उर्मट प्रतिसाद नेहमी येत असतात. आपण जर चांगल्या आणि सभ्य भाषेत आणि फक्त मुद्द्यावर केंद्रित असणारा प्रतिसाद दिला तर असले वाद होणारच नाहीत. दुर्दैवाने हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि पचनी ही पडत नाही.

मला भांडण वगैरे अजिबात करायचे नाही. तसे असते तर मी माझ्या आधीच्या प्रतिसादातूनच ते सुरू केले असते जे की मी नाही केले. मी कधीही स्वतःहून वैयक्तिक टीका असणारी, बोचरी, झोंबणारी, टोमणा मारणारी भाषा प्रतिसादांमध्ये वापरत नाही. पण समोरचा जर तशा भाषेत बोलायला लागला तर कोण कसे ऐकून घेईल?

लहान मुलांच्या गोष्टीमध्ये सिंह बोलतो. सिंह कसा बोलू शकेल असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो हे सगळ्यांना माहित असते. हा लेख मी नगरपालिकेचा ढिसाळ कारभार दाखविण्यासाठी लिहिला होता. थोडेसे विनोदी लिहून वाचतांना बरे वाटावे हा माझा हेतू होता. "मी मागासलेला" लिहितांना पण हाच हेतू होता. पण दुर्दैवाने हे स्पिरीट समजून घेतले जात नाही. मनोगतवर वाद घालून आणि आकांडतांडव करून कुठल्याही कृतीविना वादांचा शून्य उपयोग असतो हे तरी आपण लक्षात घ्यायला हवे.

--समीर