तरी बॉम्बच्या उपयोगात मला तरी अट्टाहास न दिसता युद्धनिती व मुत्सद्दीपणाच दिसतो.
अट्टाहास कसा नाही, ६ ऑगस्टला पहीला बाँब टाकला, २ लाख निरपराध नागरीक मारले गेले. ९ ऑगस्टला लगेच दुसरा बाँब! परत १ लाखाच्यावर निरपराध मारले गेले. एका बाँबनी पुरेशी दहशत निर्माण झाली नाही का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिरोशिमावरील बाँबनी त्याची संहारक शक्ती जगाला दाखवली होती, तरी सुद्धा दुसरा बाँब टाकणे म्हणजे निव्वळ अट्टाहासच!
जेते नेहमीच बरोबर असतात असं नाही पण ते जिंकले असल्यामुळे त्यांच्या चूकीच्या कृत्यांवरही पांघरुण घातलं जातं.
राहुल