अगाथा ख्रिस्तीची "हॅलोविन पार्टी" ही कादंबरी वाचून मला हॅलोविन बद्दल जे उमजले होते ते आणि तुमचा लेख यात फक्त भोपळा सामाईक आहे! अर्थात कादंबरी हॅलोविन संबंधी नसून हॅलोविन पार्टीच्या वेळी झालेल्या खुनाबद्दल आहे. त्यामुळे त्यातून जास्त माहितीची अपेक्षा करणं पण बरोबर नाही. असो. तुम्ही दिलेल्या नवीन माहितीबद्दल धन्यवाद. हॅलोविनचा आणि मृतात्म्यांचा इतका जवळचा संबंध आहे हे मला अजिबात माहिती नव्हते.