सुखदा,
माझ्याकडे अगदी उलटे चित्र आहे. माझे भाचे कुरकुर करत असतात की.."आमच्या बाईंना ना काही कळतंच नाही. त्या तेच तेच प्रश्न परतपरत विचारतात परीक्षेत !" कारण इतरांना शिकायला वेळ जात असला तरी याचा अभ्यास एकदम तयार असतो ! इतरांसाठी थांबायचं म्हटलं की त्याला कंटाळा येतो आणि तो त्यांना शिकवायला घेतो !
कुठलीही गोष्ट शिकणे ही लहान मुलांच्या बाजूने बघायला गेलं तर 'बाये हाथ का खेल' असते.. फक्त मोठी माणसं किती छान पद्धतीने ती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात यात सगळी गोम असते ! आपल्याला जी गोष्ट अवघड वाटते, ती गोष्ट समजवून सांगणे आपल्याला आणखीन अवघड असते त्यामुळेच तेच त्यांच्यासाठीही अवघड असल्याचं सांगून आपण 'अवघड अभ्यासाचा विरोध' करायला जातो !
ज्यांच्या आईवडीलांना इंग्रजीचा गंध नाही, अशा मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश मिळतो का? आमच्याकडे सगळेचजणं मराठी माध्यमात शिकलो/शिकत असलेलो असल्याने मला याबद्दल काही माहिती नाही, पण बऱ्याच जणांना म्हणताना ऐकलं आहे की प्रवेश प्रक्रियेत पालकांच्या इंटरव्ह्यूचाही काहितरी भाग असतो वगैरे. जवळच्यांपैकी कोणालाही एखादी भाषा येत नसल्यास त्या भाषेमध्ये शिक्षण घेणे अत्यंत अवघड असते. माझी आई जेव्हा हिंदीमध्ये पाढे म्हणून दाखवते तेव्हा जबरदस्त मौज वाटते ! :D
३ वर्षापुर्वीपर्यंत मी स्वतः दहावीपर्यंतच्या मुलांच्या शालेय अभ्यास आणि स्कॉलरशिपच्या शिकवण्या घेतल्या असल्याने मराठी माध्यमात तरी त्या-त्या वयाला न समजेलसं काही होतं असं मला वाटत नाही. सद्यस्थितीबद्दल विशेष माहिती नाही त्यामुळे चु.भू.द्या.घ्या.