मृदुला आणि चित्त यांच्याशी सहमत.
संतांनी वैज्ञानिक का बनावे हे कळले नाही. आपली वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती का झाली नाही हा बराच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. सुश्रुत, आर्यभट्ट यांच्यामध्ये जी ज्ञान मिळवण्याची इच्छा होती ती नंतरच्या काळात का नष्ट झाली? विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन गोष्टी शोधण्यासाठी निरपेक्ष दृष्टिकोन ठेवून अथक परिश्रम करावे लागतात. (ह्या संदर्भात रिचर्ड फिनमन यांनी बी. बी. सी. ला दिलेली मुलाखत बघण्यासारखी आहे.  नाव- "द प्लेझर ऑफ फ़ाईंडींग थिंग्ज आऊट")
ही वृत्ती आपल्या समाजामध्ये नंतरच्या काळात अजिबात नव्हती. पण याचे कारण केवळ धर्म किंवा संतांची शिकवण हे पटत नाही. याच काळात युरोपामध्ये चर्चचा प्रचंड पगडा होता. कोपर्निकस, गॅलिलिओ या वैज्ञानिकांना आपल्या संशोधनापायी चर्चचा रोष पत्करावा लागला होता. तरीही शेवटी तिथे विज्ञानाचा विजय झाला. मिकेल अँन्जेलो, दा विंची, मोझार्ट यांच्यासारखे दिग्गज कलावंत कलाक्षेत्रामध्ये क्रांती घडवत होते. सर्व क्षेत्रांमध्ये नवीन विचारांचे स्वागत होत होते. याच काळात भारतीय समाज सतत परकीय आक्रमणाखाली झुंज देत आणि आपापसात लढायांमध्ये गुंतला होता.
हॅम्लेट