वेदश्री आपण खरचं छान लिहिता बाई!!!
मुलांना अभ्यास आहेच आणि तो करवून घ्यावा लागतोच.शिवाय रोज रोज इंग्रजी, गणित, पर्यावरण अभ्यास, भाषा, संगणक आणि सामान्य ज्ञान या पैकी किमान 3 विषयांचा तरी अभ्यास असतोच. सात साडेसात वाजता नोकरी करुन घरात शिरलेल्या आईला दहा वाजता मूल झोपायच्या आधी स्वयंपाक करुन, अभ्यास घेऊन, त्याला जेवायला घालायची घाई (सकाळची शाळा असल्याने) थोडक्यात म्हणजे सगळ्याचीच घाई असते. त्यामुळे आमच्या लेकरासारख्या कामचुकार मुलांचा फावंत. असो. सध्या तरी गोडी आहे. अभ्यासात जरा रस आलेला आहे. त्यामुळे मी तुला हे करुन दाखवतो, असं लिहून दाखवतो तसे पाढे म्हणून दाखवतो वगैरे चालतं. बाकी अभ्यासक्रम अवघड वगैरे आहे खराच पण कष्टेवीण फळ नाही.. असं म्हणायचं आणि पुढे चालायचं आणखी काय?