अनुप्रिता,

माझ्या प्रतिसादांमुळे उगाच 'विनोद-विरंगुळा' विभागातील तुमच्या चर्चाप्रस्तावाला गंभीर वळण लागलं, त्यामुळे क्षमस्व.

सात साडेसात वाजता नोकरी करुन घरात शिरलेल्या आईला दहा वाजता मूल झोपायच्या आ‍धी स्वयंपाक करुन, अभ्यास घेऊन, त्याला जेवायला घालायची घाई (सकाळची शाळा असल्याने) थोडक्यात म्हणजे सगळ्याचीच घाई असते.

माफ करा, पण असा प्रसंग माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या आसपासच्यांच्या बाबतीत आजवर कधीच आला नाही त्यामुळे त्या नजरेने मी विचार केला नव्हता. माझे प्रतिसाद काहीसे एकांगी झाले आहेत असे आता वाटू लागले आहे. असो.