इथे घरोघरी लहान मुले भेट मागायला का येतात ते पुढील भागात सांगितलेस तर बरे होईल. आता ह्या सणाबद्द्ल अपेक्षीत माहिती मिळाल्यामुळे साजरा करताना उमजुन साजरा करण्याचे समाधान मिळेल.
फार पूर्वी पाश्चात्य समाजात गरीब भिकारी घरोघरी जाऊन त्यांच्या घरांतील मृतात्म्यांसाठी प्रार्थना करत. त्याबदल्यात यजमान त्यांना अन्न व इतर वस्तूंचे दान करत. या प्रथेतून 'ट्रिक ऑर ट्रीट' ची संकल्पना पुढे आली.
यापुढील भागात या इतिहासाचा उल्लेख करायचा नसल्याने तो खुलासा येथेच करत आहे, तरी हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल अनेक धन्यवाद.