कोपर्निकस, गॅलिलिओ या वैज्ञानिकांना आपल्या संशोधनापायी चर्चचा रोष पत्करावा लागला होता. तरीही शेवटी तिथे विज्ञानाचा विजय झाला. मिकेल अँन्जेलो, दा विंची, मोझार्ट यांच्यासारखे दिग्गज कलावंत कलाक्षेत्रामध्ये क्रांती घडवत होते.

कारण युरोपीय रिनेसंस! (फ्रेंचमध्ये बहुधा रिनेसाँ उच्चार असावा. मराठी पुनर्जागरण?) कॉन्स्टंटिनपलच्या पाडावानंतर, पूर्वी रोमन साम्राज्य मावळले आणि ज्ञानगंगा युरोपात आली. सर्वात आधी परिणाम इटलीत झाला. कला, स्थापत्य, वास्तुशास्त्र, विज्ञान आदी सर्व क्षेत्रांवर हा परिणाम ठसठशीत होता/आहे. वाईट परिणामही झाले. जे रोमन ते श्रेष्ठ असे अतिरेकी मत बनले. उदाहरणार्थ: बिचाऱ्या गॉदिक वास्तुकलेला वाईट दिवस आले. जिथे तिथे रोमन वास्तुकला आली.

चित्तरंजन