पॅटर्नाला कित्ता किंवा साचा हे समर्पक शब्द आहेत. कित्ता गिरवणे हा वाक्प्रचारही प्रचलित आहे. आकृतिबंध हा शब्द जड वाटतो. त्यामानाने हे शब्द सोपे आहेत. अर्थात कोणत्या संदर्भात शब्द वापरायचा आहे त्यावरही अवलंबून आहे. संगणकाची आज्ञावली लिहिताना 'डिझाइन पॅटर्न' असा अर्थ अभिप्रेत असेल तर रचनाशैली हा शब्द वापरता येईल.