मला आपलं म्हणणं पटलं. यातील दुसरा भाग जो आहे तो म्हणजे त्यापासून आपण शिकायचे धडे!
त्या मुद्द्यावरती काही माझी मते :
१) आपण अजूनही आपल्यामुळे जगाला आपला धाक वाटेल अश्या परिस्थितीत नाही. त्यामुळे ज्यावेळेला अशी एखादी संधी चालून येईल त्यावेळी, जगाची चिंता न करता, स्वत:ला संपूर्ण फायदा होईल अश्या पद्धतीने युद्धावरती नियंत्रण केले पाहिजे. या संदर्भात जर कारगिलचा ताजा इतिहास बघितला तर, त्यावेळेला आपल्याला आपण विकसित केलेली नवीन क्षेपणास्त्रे वापरून पहाण्याची चांगली संधी होती. पाकिस्तानसारखी उत्तम प्रयोगशाळा होती. आणि जर प्रयोग यशस्वी झाले असते (किंवा झालेच असते) तर आपली मनुष्यहानी तर टळली असतीच पण जगाला पण आपला क्षेपणास्त्रे विकासाच्या प्रगतीबाबत एक अहवालच तयार झाला असता. (संदर्भ - अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला तो, अणुचाचणी नंतर जवळजवळ १ महिन्यानी)
२) त्यामुळे पुष्कळ प्रमाणात आपला एक दबदबा निर्माण झाला असता.
३) अमेरिका काय किंवा युरोप काय, युद्धानंतर त्याचा पुढे काय फायदा होईल त्याचासुद्धा विचार करतात. ( संदर्भ - ७०० विमानांनी ४,००० टन दारूगोळ्याचा जपानवर वर्षाव केला जातो. याची खरोखर जरूरी होती काय? याचे उत्तर, 'अमेरिकेला त्यांचा जुना साठा (नवीन तंत्रज्ञानामुळे निरूपयोगी असा) संपवण्यासाठी होती' असे आहे असं मानलं तर पहा काय फरक पडतो ते. असाच विचार आपण (कारगिल युद्धाच्या वेळी) केला होता काय?
याप्रकारे जेते वागत आलेले आहेत त्याप्रमाणेच आपणही वागले पाहीजे, हा तो धडा!!
प्रतिसाद कळवावा.
प्रसाद.