६ ऑगस्टला पहीला बाँब टाकला, २ लाख निरपराध नागरीक मारले गेले. ९ ऑगस्टला लगेच दुसरा बाँब! परत १ लाखाच्यावर निरपराध मारले गेले. एका बाँबनी पुरेशी दहशत निर्माण झाली नाही का?

नाही. जर अशी दहशत बसली असती तर जपानी शासनाने (सम्राटाने नव्हे) शरणागतीची, कमीतकमी शस्त्रसंधीची, बोलणी सुरू केली असती (सूतोवाच तरी!!) पहिल्या बॉम्बनंतर जपानने पुन्हा एकदा 'मरेपर्यंत लढू' हाच पवित्रा जगजाहिर केला इतकेच नव्हे तर मांचुरियातून आपले सैन्य घूसवून चीनसमोर दुसरी आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली (याच वेळी जपानी दूत मॉस्कोत रशियाशी बोलणी करण्यासाठी हजर होते)

यात दुसरी ही सुद्धा शक्यता होती की जपान रशियाशी तह करून अमेरिकेला काटशह देइल. युद्ध संपता-संपता रशिया व अमेरिका-ब्रिटनचे 'फाटले' होते ही गोष्ट जगजाहीर होती.  जपानचे निमित्त काढून स्टालिन दोस्त-राष्ट्रांवरच उलटायची दाट शक्यता होती. स्टालिनचा डोळा चीन व नैऋत्य एशियातील warm water ports वर होता ही गोष्टसुद्धा सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ दिसत होती.

सद्य परिस्थितीत एकच उपाय होता - युद्धाचा निर्णायक व शक्य तितका लवकर अंत. जपानवर आक्रमण शक्य नव्हते, तेंव्हा जे शक्य होते ते केले गेले. दुसरा हल्ला. जर त्यातूनही जपानने शरणागती पत्करली नसती तर (माझ्या मते) तिसरा हल्लाही झाला असता. युद्धनितीनुसार त्यात काहीही गैर नव्हते. नैतिकता, मानवी हक्क वगैरे इतर बाबी आहेत. त्यांची चर्चा येथे करण्यात अर्थ नाही. अभ्यासूंनी नानकिंगची कत्तल, सिंगापूर/मलेशियामधील जपानी सैन्याचा दहशतवाद, इ. वाचावे.

अमेरिकेने जे केले ते बरोबर की नाही याचा कौल मी (येथे) देत नाही आहे. येथे मी फक्त युद्धनितीनुसार अणुहल्ला का केला गेला त्याची काही कारणे देण्याचा प्रयत्न केला आहे.

जेते नेहमीच बरोबर असतात असं नाही पण ते जिंकले असल्यामुळे त्यांच्या चूकीच्या कृत्यांवरही पांघरुण घातलं जातं.

हे तर अंतिम सत्य आहे. आपण श्री आनंद साधले यांचे 'हा जय नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक वाचले आहेत का? नसल्यास जरूर वाचावे.

क. लो. अ.

अभय नातू