अमित,
खूप चांगला उपक्रम. माझ्या संगणकाला प्रशासक हक्क(ऍडमिनिस्ट्रेटर राइटस) नाहीत, पण तरी सध्या लोटस नोटस वर मला रोज किमान ५ व्हायरस मेल येतात. त्यांची शीर्षके अशी:
"फुकट व्हॅलियम,कोकेन मिळवा", "१५ मिनिटात आपल्या प्रेयसीला दाखवा." "re:(6)""smith barney: citybank registration number"(माझे सिटीबँक खाते नाही.), "fwd: your private invitation""CEAPEST DRUGS ON THE WEB" ई.ई.
हा जंतू माझ्या संगणकावर इंटरनेट असल्याने आला कि माझी इतर मेल रिडीफ,याहू इ.इ. वरुन आला? आता प्रशासक हक्क नसताना तो घालवायचा कसा? तसेच काही मेल येतात ज्यात 'फुकट अँटीव्हायरस' आहे असा दावा असतो. असे एक मेल मी उघडले होते. व्हायरस ची आपल्या संगणकावर गुप्तपणे कॉपी होणारी फाईल सर्च करुन खोडता नाही का येत?
मी अगदी सुरुवातीला अशा शीर्षकाचे मेल उघडले होते, पण ऍटॅचमेंट उघडली नव्हती. तरीही माझ्या संगणकाला रोग लागला आहे का? आणि माझ्या संगणकावरुन मलाही न कळता अशी मेल इतराना माझ्यातर्फे जात आहेत का? तसेच काही मेल मधे .jpg असतात. त्या क्लिक करुन उघडल्या नाही तरी माझ्या संगणकाला रोग लागतो का?
आपली(चिंतातुर)अनु