मी वरती म्हटले होतेच---
यावर साधक बाधक चर्चा व्हावी हा उद्देश आहे. त्यात राजकीय, सामाजिक, तात्त्विक मते यावीत. तसेच ६० वर्षांनी या घटनेचे जगावर कसे परिणाम झाले हे बघावे. भारताला यापासून काय शिकता आले/येईल हे पण आपण मांडू या.
याकरिताच मी फक्त घटनाक्रम दिला होता. त्याच घटनांतून वेगवेगळी मते आणि निष्कर्षे काढली जातील. आपण वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या घटनांचा विचार केला पाहिजे. आपले मत अगोदरच ठरवले असेल तर आपण केवळ त्याच "चष्म्यातून" त्या घटना पाहाल. तसे करू नका ही विनंति.
खरोखर कोऱ्या पाटीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला विचार करता येणे ही प्रगल्भतेची खूण आहे.
महाभारत मालिकेचा काळ जसा झालेल्या घटनांकडे निर्विकार मनाने बघतो तसे करून काय वाटते ते पहा.
मुद्दाम मी फक्त जपानवरील अणुहल्ला असा मर्यादित स्वरूपाचा घटनाक्रम घेतला आहे. दुसरे महायुद्ध हे प्रचंड आवाक्याचे असल्याने एव्हढा मोठा विषय इथे मांडणे हे जवळ जवळ अशक्य आहे.
कळावे,
परभारतीय