अंतर्नाद या मासिकाने गेल्या वर्षी असा उपक्रम राबवला होता. लोकमताच्या चाचणीनुसार मराठी साहित्यातील वीस मैलाचे दगड ठरू शकणाऱ्या पुस्तकांची यादी तयार केली होती. या सगळ्या पुस्तकांची नव्याने केलेली परीक्षणे 'अंतर्नाद' च्या येत्या दिवाळी अंकात समविष्ट करण्यात येणार आहेत.
अवांतर: 'अंतर्नाद' या मराठीतील कदाचित एकमेव दर्जेदार मासिकाविषयी 'मनोगत' वर फारसे वाचल्याचे आठवत नाही. असे का असावे?