श्री. समीर,

"तुम्ही म्हणता म्हणून विश्वास ठेवतो, माझ्या वाचनात मात्र कधी आले नाही."या विधानामध्ये अविश्वास ठासून भरलेला आहे. उपहासाची एक झलकही यात आहे.
मला नाही तसे वाटत. कारण ह्याचा सरळ सरळ असा अर्थ आहे की, 'मी ही पेपर वाचतो, पण, काही कारणास्तव (एखाद्या दिवशीच्या घाईगडबडीत) एखादी बातमी वाचायची राहून जाते. तसे झाले असावे. पण, तुमच्या शब्दांचा मी आदर करतो, त्यावर विश्वास ठेवून, आपल्या वादात आपण पुढे जाऊया.' 

कोणालाही यातून, " तुम्ही म्हणताय राव, पण माझा विश्वास नाही. तुम्ही जे म्हणताय ते काही विश्वास ठेवण्यासारखे नाही पण जाऊ द्या, ते एवढे महत्त्वाचे नाही..." असा उलटतपासणी केल्यासारखा आणि अविश्वास दर्शविल्यासारखा सूर गवसेल.
जे कधी माझ्या वाचनात आले नाही ते फक्त कोणीतरी असे म्हणते आहे म्हणून ग्राह्य मानायचे ठरवले तर, वर्तमानपत्र वाचावेच का? इतरांकडून सर्व माहिती मिळत असतेच. पण, आपण वर्तमानपत्र वाचतो. त्यातूनही, एखादी बातमी आपल्या नजरेतून सुटली असेल तर आणि समोरच्यावर आपला विश्वास असेल तर आपण काय म्हणणार? 'तुम्ही म्हणता म्हणून विश्वास ठेवतो' ह्यात गैर काय आहे? न वाचताही 'हो..हो.. मीही वाचलंय' असं खोटंच म्हणायचं? असो.

थोडेसे विनोदी लिहून वाचताना बरे वाटावे हा माझा हेतू होता. "मी मागासलेला" लिहिताना पण हाच हेतू होता. पण दुर्दैवाने हे स्पिरिट समजून घेतले जात नाही.
आपल्या वादाला मूळ सुरुवात झाली ती, 'त्यावेळेस वाटतं की या भारत देशाविषयी अभिमान वाटावा असं या देशाने काय दिलं आहे?'
ह्या आपल्या निराशाजनक विधानातून. आपणही आशावाद जोपासावा ह्या उद्देशातून मी 'तळमळ' हा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे, मनोगतवर वाद घालून आणि आकांडतांडव करून कुठल्याही कृतीविना वादांचा शून्य उपयोग असतो हे तरी आपण लक्षात घ्यायला हवे. ह्या आपल्या, वरील प्रतिसादातील, वाक्याकडे मी दुर्लक्ष करीत आहे. माझ्या 'तळमळ' ह्या प्रतिसादातील 'आपल्या तळमळीतील शुद्धता वादातीत आहे ह्यात शंका नाही.' ह्या वाक्याने मी आपले लेखन गांभीर्यानेच घेतलेले आहे हे स्पष्ट आहे. 
आता बहुतेक मुद्द्यांवर विचारविनिमय झालेला आहे. माझ्याकडून हा वाद संपलेला आहे. माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा राग नाही.

धन्यवाद.