अनु,

सर्वप्रथम तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

तुमच्या संगणकाला "नसलेल्या" प्रशासकीय अधिकारांचा तुम्हाला येणार्‍या मेल्सशी संबंध नाही. "लोटस नोट्स" सुद्धा त्यास जबाबदार नाही. अश्या मेल्स येण्याचा मुख्य स्रोत हा बहुतेक वेळा "शुभेच्छापत्रांची संकेतस्थळे" हा असतो. अथवा ज्या ज्या संकेतस्थळांना तुम्ही तुमचा लोटस नोट्स मधिल मेल आयडी दिला आहे ती संकेतस्थळेही याचा स्रोत असू शकतात.

लोटस नोट्स मध्ये, येणार्‍या मेल्स गाळण्याची (फिल्टरींग) सोय असेल तर तश्या गाळण्या लावा. गाळलेल्या मेल्स आपोआप कचरपेटीत जातील अशी सोय करा. अश्या मेल्स अजिबात उघडू नका. मी सांगितलेली सर्व सॉफ्टवेअर्स (२, ३ व ४) तुमच्या संगणकावर बसवा. (तिनही व्यक्तीगत वापरासाठी फुकट आहेत)

थोडक्यात, मेल्स येणे हे (काही अंशी) आपल्या हातात नाही, परंतु मेल आपल्या संगणकावरुन जाऊ न देणे हे आपल्या हातात आहे.

असो आता सर्वच गोष्टी इथे सांगत नाही, त्या मला याच लेखाच्या पुढील भागांमध्ये लिहावयाच्या आहेत.

तुमच्या संगणकावरील रोग (असल्यास) नाहीसा होण्यास माझ्या शुभेछा.

अमित चितळे