कथेत प्रकरण शेवटी कथानायकावर उलटणार याचा आगाऊ अंदाज असूनसुद्धा ते नेमके कसे उलटणार हे जाणून घेण्याची उत्कंठा अधिक प्रभावी वर्णनशैली कथेशी शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास समर्थ ठरली. कथा भयंकर आवडली.

'काही नाही रे बाळा, चहात थोडंसं गुंगीचं औषध घातलं होतं. बऱ्याच दिवसांत मेजवानी झाली नाही बघ. घाबरू नकोस, तुला काहीही त्रास होणार नाही, कळणारही नाही सुरी कशी फिरते ते.'
किती प्रेमळ आजी! कथा आवडली.

कथेत काय आवडले / सर्वात जास्त काय आवडले याचा विचार करत होतो, तेवढ्यात चित्तंचा हा प्रतिसाद पाहिला. अगदी नेमके हेच आवडले! म्हातारीचे त्या प्रसंगातले प्रेमळ उद्गार (अत्यंत casual पद्धतीने म्हटलेले) मानेवरून सुरी फिरण्याआधीच अंगावर शिरशिरी आणून जातात. 'कहानी में ट्विस्ट' नसूनही शेवट अत्यंत प्रभावी! किंबहुना चांगली भयकथा लिहिण्यासाठी 'कहानी में ट्विस्ट' अत्यावश्यक नाही, हे यातून पटते.

हॅलोवीनवरची लेखमालाही आवडली.

- टग्या.