बदल सुचवलेले चालतील म्हणून सविस्तर प्रतिसाद दिला आहे. आपण रागावणार नाही अशी आशा आहे.
--------- रागावले नाही. मी काव्यक्षेत्री अजाण असल्यामुळे कोणत्याही सूचना स्वागतार्हच आहेत. शिवाय, मला कविता चांगली लिहिता आली आहे असे माझे मतही नाहीच.
पाने झडणे पेक्षा काव्यामध्ये पान गळणे हा अधिक योग्य शब्द वाटतो.
पहिल्या कडव्यात भांडारकरांनी सुचवलेल्या बदलात पाने हा बदल योग्य वाटतो पण 'गळणे' हा शब्द अधिक योग्य. पानगळती हा रोग नाही, ती नैसर्गिक घटना आहे. दरवर्षी घडणारी. "विषाद दाटे रानी " कसे वाटते पहा. यात मृत्यूची चाहूल हा अर्थ अभिप्रेत आहे.
--------- पान गळणे, तो रोग नसणे, विषाद दाटे ह्या सगळ्याशी सहमत.
कोणताही ऋतू झाडाच्या अंगी येत नसतो, शिवाय पान गळताना 'रेडा साथी' ऐवजी वारा तिथे असणे अधिक अर्थवाही आहे. हे आणि असेच इतर बदलही आपण तार्किकतेसाठी तपासून पहा.
---------- गात्री येण्यामध्ये तो झाडाच्या गात्री येणे मला अपेक्षित नव्हते. मूळ कवितेमध्येही वसंत माझ्या दारी येतो तेव्हा हा मी म्हणजे झाड आहे की मी स्वतः? ह्या कवितेत मला झाड नव्हे तर मी स्वतः अपेक्षित होते. झाडे वगैरे केवळ आजूबाजूच्या परीस्थितीचे वर्णन असे मनांत होते. मात्र झाड असेही घेणे चांगले वाटेल. त्यामुळे रेड्या ऐवजी वारा साथीला असणे जास्त चांगले वाटेल.
हेमंत आणि शिशिरात तापमानात नेमका काय फरक असतो ते जाणून आणखी बदल करता येतील. शेवटचे कडवे मनाला अधिक चटका देणारे करता येईल.
----------- शिशिर हा दोन महिन्यांचा ऋतू माघ आणि फाल्गुनात येतो, म्हणजे फ़ेब्रु. चा शेवट-मार्च- एप्रिलची सुरुवात असा. चैत्र एप्रिलात सुरू होतो. त्यामुळे शिशिरापेक्षा हेमंतामध्ये (डिसे. चा शेवट-जाने-फेब्रु ची सुरूवात) भारतात थंडी अधिक असावी असे वाटते, त्यामुळे शिशिराऐवजी हेमंत घेतला होता. शेवटचे कडवेच काय संपूर्ण कविताच अधिक चांगल्या प्रकारे, चटका देणारी होऊ शकेल. मात्र मला ते जमलेले नाही ह्याची कल्पना आहे.
सर्व सूचनांबद्दल मनापासून धन्यवाद.