विकिकर,

आपण चर्चेला घेतलेला मुद्दा खूपच छान आहे आणि मनोगतवरील तज्ज्ञ नक्कीच त्यात मोलाची भर घालतील अशी आशा आहे. उपक्रमाबद्दल तुम्हाला शुभेच्छा.

एक शंका विचाराविशी वाटली म्हणून हा प्रतिसाद लिहित आहे. 'मराठी वाङ्मयाचे मैलाचे दगड' असा शब्दप्रयोग वापरण्याऐवजी 'मराठी वाङ्मयप्रवासातील अमूल्य वटवृक्ष' असा उल्लेख जास्त योग्य झाला असता असे वाटते.

प्रत्यक्षात महामार्गांवर मैलामैलाला किती अंतर कापले गेले किंवा एखाद्या ठिकाणाप्रत पोहोचण्यास जाण्यास बाकी आहे वगैरे दाखवणारे दगड लावले जातात हे जरी खरे असले तरी त्याऐवजी प्रवास सुंदर करवला जातो तो तर सोबत साथ करणाऱ्या वनश्रीनेच ! एखादा सुंदर डेरेदार वटवृक्ष पाहून, अनुभवून जी अनुभूती, जो आनंद मिळतो तो केवळ शुष्क असा मैलाचा दगड पाहून मिळतो का? मूळ म्हणजे काहीकाही प्रवासच असे असतात की अंतिम स्थानी पोहोचण्यापेक्षा प्रवासातलाच आनंद लुटण्यात जास्त आनंद वाटतो.. वाङ्मयाचा प्रवासही याच प्रकारात मोडतो असे नाही का वाटत? याच विचारांमुळे उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांनाही 'मराठी वाङ्मयाचे मैलाचे दगड' अशी उपमा देण्याऐवजी मलातरी त्यांना 'मराठी वाङ्मयप्रवासातील अमूल्य वटवृक्ष' संबोधणे जास्त योग्य वाटले. 

'मराठी वाङ्मयाचे मैलाचे दगड' असा शब्दप्रयोग वापरण्यामागे काही विशेष हेतू आयोजकांच्या मनात असेल तर त्याबद्दल मला काहीच माहिती नाही त्यामुळे चु.भू.द्या.घ्या.