वैभव, गझल चांगली आहे.  'वसंता'नंतर आलेली ही गझल सामाजिक जाणिवेची आहे. :)

आता कधी , कुठेही लढण्यास सिध्द झालो
घेऊन हिंडतो मी भात्यात माणसांना
वाव्वा.. मला हा शेर सर्वाधिक आवडला. क्या बात है.

त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना
असून खटकतो त्याऐवजी हे बरे वाटते-
त्यांच्यात राहुनीही माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना


ओळख म्हणून उरली ही राख दंगलीची
मी स्पष्ट पाहिलेले पलित्यात माणसांना
वाव्वा. लघू अक्षरांचा वापर कानांना खटकू शकतो. त्यामुळे हा शेर मला असा लिहावासा वाटला -
उरली तशी म्हणाया ही राख ओळखीची
मी स्पष्ट पाहिलेले पलित्यात माणसांना
अर्थात वरच्या मिसऱ्यात दंगल आलेली नसल्याने. शेर आधीच्या शेरासारखा स्पष्ट नाही. पण राख आणि पलित्यात पाहलेली माणसे ह्यावरून ही दंगलीचीच राख असणार, हे स्पष्ट होते असे वाटते.

दगडामध्येच होते दर्शन तुझे अताशा
कंटाळलास का रे इतक्यात माणसांना
वरच्या ओळीत शेवटचे तीन शब्द आधी टाकावेसे वाटले. का रे ऐवजी इतका टाकावासा वाटला.
दर्शन तुझे अताशा
दगडामध्येच होते
कंटाळलास इतका इतक्यात माणसांना

चित्तरंजन