वैभव, गझल आवडली.
घेण्यास श्वास थोडी जागा हवी जिवाला
बांधायचे कशाला नात्यात माणसांना ?
त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना
हे दोन शेर विशेष आवडले. चित्त यांनी सुचविलेले बदलही छान वाटतायत, विशेषतः "कंटाळलास इतका इतक्यात माणसांना"
चित्त,
उरली तशी म्हणाया ही राख ओळखीची
मी स्पष्ट पाहिलेले पलित्यात माणसांना
यात "ओळखीची" ऐवजी "दंगलीची" असं लिहीलं तर मात्रांत फरक होईल का?
साती