कथा वाचताना मराठीचा गोडवा, मराठी संवादाची लकब, ओघवती भाषा आणि नेमकेपणा ह्या गोष्टी जाणवल्या. हा अनुवाद आहे असे अगदी मोजक्या ठिकाणी जाणवले. भाषांतर केले तरी ते वाचकाला जाणवणार नाही इतके मराठमोळे झाले आहे. आजकाल मराठी लेखनावर इंग्रजीचा प्रभाव कित्येकांच्या लेखनात दिसून येतो. (हा प्रतिसादही त्याला अपवाद नाही!) शेवटच्या संवादातील मोठे वाक्य आपण छोटी दोन तीन वाक्ये करून लिहिले तर अधिक चांगले. मनोगतावर येणाऱ्या अनुवादांमध्ये अथवा इंग्रजीचा आधार घेऊन केलेल्या लेखनात एक दोन सदस्यांच्या लेखनाचा अपवाद वगळता हे लेखन जास्त मराठमोळे वाटले.