धा ( दधाति - धत्ते) ह्या धातूचा अर्थ ठेवणे असा होतो, संधान, अवधान, विधान, परिधान, प्रधान(?) अशा स्वरुपात तो आपल्याला परिचित आहे (असे वाटते). तेव्हा इनपुटसाठी अंतर्धान आणि आउटपुटसाठी बहिर्धान हे शब्द योग्य होतील असे वाटले होते. परंतु अंतर्धान हा शब्द इतर अर्थाने आधीच प्रचलित असल्याने अडचण आहे. तरीही वापरून परिणाम अजमावायला हरकत नाही! (माझे संस्कृत ज्ञान जुजबी आहे आणि त्याचेही बरेच विस्मरण झालेले आहे. कृपया चू. भू. द्या. घ्या.)
थेट शब्द मिळाला नाही तर इनपुट ला कारक (फॅक्टर अशा अर्थी) आणि आउटपुटला निष्पन्न (रिझल्ट अशा अर्थी) असे काही म्हणता येईल.