वनश्रीतील प्रत्येक वनस्पती येथे अभिप्रेत नाही.त्या दृष्टीने वेगळे चर्चा पान आधीच उपलब्ध आहे.येथील चर्चेत विशिष्ट अंतराचा नव्हे पण अंतराचा टप्पा अभिप्रेत आहेच.हा निकष लावला नाही तर समकालीन लोकप्रिय साहित्याचाच विचार होईल,लोकप्रियतेचा निकष असला तरी तो एकमेव नाही त्याचे वाङ्मयीन मूल्य, आणि प्रभाव- प्रभाव हा असा निकष आहे की जो बऱ्याचदा अप्रत्यक्षही असू शकतो.

'मराठी वाङ्मय प्रवासातील अमूल्य वटवृक्ष' हा प्रयोगही ठीक आहे. चर्चेच्या ओघात अजून काही वाक्य आणि शब्दप्रयोग सुचले तर स्वागतच आहे.त्यानिमित्ताने निकषांची चर्चा पण होऊ शकेल.