आपले बरेचसे शास्त्रीय लेखन आतापर्यंत वाचले आहे आणि आवडले आहे. हा लेख (आणि प्लुटोचा, वीजेचा) ही आवडला. पण कौतुक अशासाठी वाटते की परदेशात ही राहून हे प्रतिमराठी शब्द आपण कसे शोधता. मीही एकदा लिहायला घेतले आणि CNS, सेंट्रल नर्व्हस सिस्टीमसाठी मध्यवर्ती मज्जा संस्थ्या म्हणावे की केंद्रीय मज्जा संस्था अशी मज्जा झाली आणि मग सरळ या शिवधनुष्याला नमस्कार केला आणि लिहीणं बंदच केलं.
विनंती: मा. प्रशासकांनी शास्त्रीय लेखनाचा स्वतंत्र विभाग करावा. निदान तेथील लेखांच्या कमी संख्येवरून तरी लिहिण्याची जाणीव होत राहील. शास्रीय लेखन करणाऱ्या साऱ्या लेखकांचे आभार !