इंटरनेट साठी आंतरजाल हा शब्द खास  करून हिंदी भाषेत आधीच प्रचलित झाला आहे.फक्त जाल आणि महाजाल हेही शब्द वापरले जाऊ लागले आहेत.

इंट्रानेट साठी वरील चर्चेत आंतर्जाल शब्द वापरलेला दिसतो त्यावर पुरसे मत प्रदर्शन झालेले दिसत नाही.

समन्तम्,माला, मण्डल, असे शब्द संस्कृतात येतात त्यांचा उपयोग या संदर्भात करता येईल किंवा कसे?

आंतरजाल शब्द सुबोध आहे  पण मराठीत बोलताना सामान्यरूपात भाषा उच्चारणात  कुठेतरी खटकतो असे वाटते, त्यापेक्षा महाजाल शब्द बरा वाटतो. 

सम प्रत्यय लावून संजाल असा शब्द बनू शकेल काय? संगणक माला,संगणक  मण्डल, संगणक समन्त असे काही शब्द होतील का ? ते कोणत्या अर्थाने वापरता येतील.

तसेच शोधयंत्रांच्या संदर्भात crawler ह्या शब्दा करिता मराठीत काय पर्याय उपलब्ध आहेत

-विकिकर