प्रस्थापित संकल्पनांना विरोधाची किनार मराठी साहित्यात नेहमीच होती.कमी कुठे अधिक कुठे , स्वल्पविराम,अर्धविराम,पूर्णविराम प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणी देतो इतकेच. हे वाहत्या नदीच - बदलत्या समाजाच प्रतीक आहे. जुनी पाने गळणे , नवीन पालवी फुटणे हाच निसर्ग नियम आहे.

आजचा विद्रोही उद्याचा प्रस्थापित असतो.किनाऱ्याची नौका कालांतराने मुख्य प्रवाहात येतेच. ती मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागत असेल तर त्याचा अर्थ पाणी कुठेतरी साचलं आहे. साचलेल्या पाण्याला वाट करून द्या ते पुन्हा धावायला लागेल.

बहुसंख्य मानवांची विचार करण्याची पद्धत घड्याळाच्या पेंडुलम -झोक्या-सारखी असते.एका टोका कडून सोडले की दुसऱ्या टोकाला पोहचतेच. भगीरथाला गंगेला वाट करून देताना तिने पूर येणे अपेक्षीत नसते.म्हटले तर पूर पाण्यामुळे येतात म्हटले तर ते त्याच्या जाण्या करता वाट करून न दिल्या मुळेही येतात.पाण्याला रंग नसतानाही पाणी दिसावंच इतपत चष्मा नैसर्गिक पणे प्रत्येक माणसाला मिळतच असतो.वेगवेगळ्या रंगाचे चष्मे वापरणारेही मानव असतात.

अशात माझा एक मित्र सर्व मित्रांशी गणगोताशी वादत होता,त्याचे म्हणणे होते की आमच्यामुळे त्याचे प्लुटो ग्रह सर करण्याचे राहिले. प्लुटोच्या भावी रहिवाशांशी सुज्ञाने वादूनये शंकाही विचारू नये.तुला प्लुटोवर जाण्याच्या शुभेच्छा! प्लुटोवर जाण्याकरता काय सामग्री लागते ते सांग घडले तेवढे करतो. न घडलेल्या बद्दल क्षमस्व!

पाला पाचोळा