हे की उघडपणे अशी धमकी देता येते. धमकी देणारा कागदोपत्री भारतीयच नव्हे तर एका राज्याचा माजी मुख्यमंत्री असतो. यावर प्रतिक्रिया द्यावी किंवा ह्या घटनेकडे गंभीरपणे बघावे असे शासनाला वाटत नाही कारण ते (कुठलाही पक्ष याला अपवाद नाहीये..) स्वतःची सुरक्षितता आणि इन्टरेस्ट जपण्यात गुंग असतात.
संसदेवर हल्ला करणाऱ्या, म्हणजेच भारतीय शासनाचा, सार्वभौमत्वाचा अपमान करणाऱ्या आणि भारताच्या सुरक्षिततेला धोका पोचवू पहाणाऱ्या अतिरेक्याला फाशी देऊ नये का तर म्हणे त्याची मुलेबाळे आहेत... ही कृत्ये करताना कुठे गेली होती ती मुलेबाळे? दुसरं कारण काय तर मानवतावाद.. अतिरेक आहे हा मानवतावादाचा... आणि आता हे... फाशी दिली तर देश पेटेल आणि न्यायमूर्तींचा खून होईल... थोडक्यात या मुसंड्यांना मनमानी करायला मिळालीच पाहिजे आणि त्यांच्यापासून सुरक्षित रहाण्यासाठी काहीही करण्याचा भारताला अधिकार नाही..