छिद्रान्वेषी
मूळ गाण्याचा दुवा दिल्याबद्दल आभार! शकील बदायुनींच्या या हृदयाला हात घालणाऱ्या कवितेचे भाषांतर करणे सोपे काम नव्हतेच. पण एक दोन ठिकाणे वगळता अनुवाद उत्तम झाला आहे.
१. "घडे पूर्ती न इच्छांची" हे "हुवा खून-ए-तमन्ना "इतके प्रभावी वाटत नाही.
२. "असे अविचार हा माझा"
या ओळीत थोडा फरक केला तर ते "हुई ये हमसे नादानी..." या मुखड्याचे भाषांतर म्हणून चांगले वाटेल.
"न कुछ सोचा न कुछ समझा" या ओळींचा वेगळा अनुवाद केला असता तर बरे झाले असते.
पण एकूण प्रयत्न चांगला झाला आहे.
(शकीलप्रेमी) चिन्मयी