हा भागही छान झाला आहे. वाचकाची उत्सुकता ताणली गेली आहे. पुढील भागाची वाट पहात आहोत.
दुसऱ्या व तिसऱ्या भागात काही ठिकाणी शब्दशः भाषांतर केले आहे असे जाणवले. उदा.
आता आम्ही तो ओढा मागे सोडला.
'आम्ही ओढयाच्या बरेच पुढे आलो होतो' किंवा 'आता ओढा मागे राहिला होता. '
"च् च् आपण यापेक्षा वाईट गोष्टी सोडवल्या आहेत. यापेक्षा
"आपण दोघांनी यापेक्षा अधिक गुंतागुंतीच्या (किचकट) गोष्टींचा छडा लावला आहे."
हे कसे वाटते त्यावर विचार करा. आमची चूक होत असेल तर ते सुद्धा सांगा. याशिवाय अशीच आणखी काही वाक्ये आहेत की ज्याचे भाषांतर आपण फेरविचार केला तर सहज अधिक चांगले करू शकाल.
प्रचीती या शब्दात इकार दीर्घ आहेत. चिकित्सकाचे उत्तर प्रचिती असे आहे. प्रशासकांना विनंती की त्यांनी योग्य बदल करावा.
चू. भू. द्या. घ्या.